
सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील चिनावल येथील एक दाम्पत्य अचानक गायब झाले असून या प्रकरणी सावदा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर या दाम्पत्यावर सावकारी चाजाचा दबाव आल्यामुळे हा प्रकार घडला असल्याची परिसरात चर्चा असून पोलीसांनी या प्रकरणी तपासाची चक्रे गतीमान केली आहेत.

सावदा प्रतिनिधी येथून जवळ असलेल्या चिनावल गावातील हरविलेल्या दांपत्याचा शोध पोलिसांकडून सुरू असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या प्रकरणी मिसिंग रजिस्टर क्र 13/2026 नोंदविण्यात आला आहे. या संदर्भात तक्रारदार टेकचंद अनिल नेमाडे ( वय 24 रा चिनावल ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे आई वडील अनिल महारू नेमाडे ( वय 57 ) व सौ भारती अनिल नेमाडे वय 46 हे दि 16 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 7 वाजता कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेले असून अद्याप परतलेले नाहीत.
हरविलेल्या अनिल नेमाडे यांचे वर्णन निमगोरे उंची अंदाजे 5 फूट 8 इंच लांबट चेहरा काळे पांढरे केस व पुढील बाजूस टक्कल जाड मिशी तसेच उजवा हात अपघातामुळे कोपरापासून वाकलेला असून गळ्यात तुळशीमाळ आहे तर सौ. भारती नेमाडे या अंदाजे 5 फूट 3 इंच उंच गोल चेहरा उंच नाक लांब काळे पांढरे केस वेणी गळ्यात काळ्या मण्यांचे मंगळसूत्र नाक कान टोचलेले व स्थूल बांध्याच्या असल्याचे वर्णन आहे
या घटनेची नोंद दि 24 मे 2026 रोजी सावदा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथके कार्यरत केली आहेत संबंधित दांपत्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान परिसरात दबक्या आवाजात सावकारीच्या तणावामुळे संबंधित दांपत्याने घर सोडल्याची चर्चा होत असली तरी या संदर्भात कोणतीही अधिकृत पुष्टी पोलिसांकडून करण्यात आलेली नाही. तसेच, पोलिसांकडून सर्व शक्य त्या अंगाने तपास सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सावदा पोलीस स्टेशन फोन 022584222043 किंवा तपासी अंमलदार रविंद्र महाजन मो 8356089592 व सहायक अधिकारी विनोद पाटील मो 9823889890 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



