पिंप्राळा परिसरातील विकास कामांच्या संविदेला मंजुरी द्या -नागरिकांचे महापौरांना साकडे(व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | महापालिकेच्या महासभेत भाजपच्या नगरसेवकाने विरोध केल्यानेच पिंप्राळा परिसरातील विविध विकास कामांसाठी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्राप्त निधीच्या संविदेस मंजुरी मिळाली नसून तत्काळ महासभेत मंजुरी देण्यात यावी अशी मागणी पिंप्राळा परिसरातील नागरिकांनी महापौर जयश्री सुनील महाजन यांना निवेदनाद्वारे केली आहे.

नागरिकांनी महापौर जयश्री महाजन यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्राप्त निधीमधून प्रस्तावित ४ कोटी ९९ लाख ८८ हजार १२१ रुपयांच्या कामांना तातडीने महासभेत मंजुरी देण्यात यावी, या निधीमधून पिंप्राळा परिसरातील कुंभार वाडा, सिध्दार्थ नगर, गणपती नगर, भिमनगर, आझाद नगर, पिंप्राळा गावठाण, हुडको रस्ता, खंडेराव नगर, मयुर कॉलनी, संत मीराबाई नगर आदी भागातील रस्ते डांबरीकरण करणे, रस्ते काँक्रिटीकरण करणे, आरसीसी गटारी बांधणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, मुख्य रस्त्याचे काम करणे, नाल्यावरील पूल बांधणे, नाल्याला संरक्षण भिंत बांधणे अशी महत्वाची व नागरिकांच्या जिव्हाळ्याची कामे करण्यात येणार आहेत. या कामांची सर्व कायदेशिर प्रक्रिया पुर्ण झालेली आहे. त्यामुळे सदर कामांच्या खर्चाच्या संविदेला तातडीने महासभेत मंजुरी देण्यात यावी, अशी विनंती वरील सर्व कॉलनी भागातील रहिवाश्याकडून करण्यात येत आहे. या विकास कामांना विरोध करणाऱ्या नगरसेवकांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये जळगावकर नागरिक धडा शिकविल्या शिवाय राहणार नाहीत, असा इशारा देखील रहिवाश्यांकडून देण्यात आला. निवेदनावर शुभम बारी, मंगेश जगताप, नगराज पाटील, विजय दांडगे, भावेश भोई, मनोज गुंजाळ, शोभा जाधव, नाना पारधी, संतोष सोनार, आशाबाई पाटील, तुषार कोळी, विश्वनाथ आमोदे, ज्योती वाघमारे आदींची स्वाक्षरी आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/6613631255376290

 

Protected Content