बळीरामपेठेतील पत्रकार भवनात ग्राहक दिनानिमित्त जनजागृती अभियान मेळावा (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील ग्राहक संरक्षण समितीच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त शहरातील बळीरामपेठ येथील पत्रकार भवनात ग्राहक जनजागृती अभियान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ॲड. निलेश निकम यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी ग्राहक संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहकांची जनजागृती मेळावा आयोजन केले होते. याप्रसंगी ग्राहकांना विविध कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. नीलेश निकम यांनी ग्राहक कायद्या, ग्राहक जनजागृती विषयी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. प्रदीप सुरवाडकर हे होते. यावेळी ग्राहकांचे अधिकार हक्क व ग्राहकांची स्वतःची फसवणूक होण्यापासून कशी सावधानता बाळगावी, आपल्या अधिकाराविषयी फसवणूक झाल्यास कुठे व कसे दाद मागावी, याविषयी जनजागृती करण्यात आले. त्याचप्रमाणे ग्राहक संरक्षण समितीचे सर्व पदाधिकारी हे ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी व ग्राहकांना फसवणुकीपासून सावधानता बाळगून मदतीसाठी सदैव तत्पर रहावे असे, आवाहन जळगाव शहराध्यक्ष संजय जगताप यांनी केले.

एखादा ग्राहकाला आपली फसवणूक झाली असल्याचे वाटत असल्यास किंवा एखादा दुकानदार किंवा विक्रेता आपली फसवणूक करत आहे, असे निदर्शनास आल्यास ग्राहकाने निर्धास्तपणे ग्राहक संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. त्यावर योग्य ती कायदेशीर करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे आवाहन संरक्षण समितीच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जळगाव जिल्हा सचिव रावसाहेब जगताप यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जळगाव शहर उपाध्यक्ष संदीप सोनवणे, सहसचिव संदीप कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. यावेळी शासकीय निमशासकीय कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/688377205664442

Protected Content