केशवस्मृती सेवा संस्थातर्फे सलग नव्या वेळी देण्यात येणार डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  जळगाव येथील केशवस्मृती सेवा संस्था समूह व जळगाव जनता सहकारी बँक लि. तर्फे  ९ व्या डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्काराचे वितरण शनिवार, १३ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी 5 वाजता महाबळ रोडवरील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे. यावर्षी यवतमाळ येथील दिलासा संस्था, पुणे पाबळ येथील विज्ञान आश्रम व मुंबई दादर येथील रामचंद्र प्रतिष्ठान यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती केशवस्मृती सेवा संस्था समूहाचे अध्यक्ष डॉ. भरतदादा अमळकर व जळगाव जनता बँकचे अध्यक्ष सतिष मदाने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

केशवस्मृती सेवा संस्था प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. अविनाश आचार्य यांच्या नावाने डॉ. आचार्य अविनाशी पुरस्कार देण्यात येत असतो. या पुरस्काराचे हे 9 वे वर्ष आहे. सेवा तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध घटकांच्या उत्थानाचे कार्य करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार देवून गौरविण्यात येते. हिच पंरपरा कायम ठेवत या वर्षाच्या पुरस्कार वितरण सोहळा १३ एप्रिल रोजी आयोजित केला आहे. डॉ. आचार्य अविनाशी पुरस्कारात स्मृती चिन्ह, मानपत्र व 1 लाख रूपये असे स्वरूप आहे.

Protected Content