कोरपावलीत आंघोळ घातलेल्या ‘त्या’ मृत कोरोनाबाधिताच्या कुटुंबातील दोन सदस्य पॉझिटीव्ह

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली येथील कोरोनाबाधित ८० वर्षीय मयत रुग्णाच्या कुटुंबातील २ संशयित व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावाचा एकच खळबळ झाली आहे. यासंदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडा सीम तालुका यावल येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.गौरव भोईटे हे वैद्यकीय पथकासह कोरपावली येथे दाखल झाले असून यावेळी पॉझिटिव्ह रुग्णाच्या प्रतिबंधित क्षेत्रात मध्ये सर्वेक्षण करून पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात आला.

सदरील ८० वर्षीय व्यक्तीचा गोदावरी मेडिकल कॉलेजच्या कोविंड रुग्णालयात उपचारादरम्यान ३० जून रोजी मृत्यू झाला होता. मृत हे कोविड-१९ संशयित असल्याने रुग्णालयाने मृतदेह प्लॅस्टिक आवरणामध्ये सुरक्षित बांधून मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी कोणताही विधी न करता कब्रस्तान मध्ये घेऊन अंत्यसंस्कार करावे अशा सूचना आणि योग्य त्या अटी व शर्तीसह मृतदेह त्यांच्या मुलाच्या ताब्यात सोपवविण्यात आला होता. परंतु संबंधित व्यक्तीने कोरपावली गावात संशयित मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे मृतदेह त्याने व नातेवाईकांनी मृतदेह दफन विधी साठी कब्रस्तान मध्ये घेऊन न जाता घरी आणून प्लॅस्टिक खोलून मृतदेहाची धार्मिक व सामाजिक रिवाजाप्रमाणे मृतदेहाची अंघोळ घातली होती. दरम्यान कोरोना संशयित म्हणून मृत्यू पावलेल्या त्या वयोवृद्ध व्यक्ती १ जून रोजी चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव आल्याने प्रशासनात खळबळ उडाली होती. तसेच शासन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मयताच्या मुलावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय डॉ.गौरव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली एल.जी.तडवी, राजेंद्र बारी, आशासेविका हिराबाई पांडव, नजमा तडवी, हसीना तडवी, सुरवाडे व समीर तडवी आदी कर्मचाऱ्यांनी या पथकात सहभागी होऊन कोरपावली गावातील होम टू होम जाऊन प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली. यावेळी त्यांच्यासोबत गावातील पोलीस पाटील सलीम तडवी यांच्यासह कोरपावली ग्रामपंचायतीचे सदस्य आदी उपस्थित होते.

Protected Content