सी-लिंक टोलनाक्यावर कार अपघातात तिघांचा मृत्यू; ६ जण गंभीर जखमी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज  वृत्तसेवा  । मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवर रांगेत उभ्या असलेल्या गाड्यांना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या अपघात ३ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले. यात दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना गुरूवारी रात्री घडली आहे. अपघाताप्रकरणी कार चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा करण्यात आला आहे.

मोहम्मद सरफराज शेख असं चालकाच नावं आहे. कार रात्री वांद्रे-वरळी सीलिंकवर टोलनाक्याजवळ रांगेत उभ्या असलेल्या गाड्यांना मागून भरधाव वेगात आलेल्या गाडीनं जोरदार धडक दिली. या अपघातात दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला. अपघातात 6 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची परिस्थित चिंताजनक आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

वांद्रे वरळी सी लिंकवरील अपघाता प्रकरणी कारचालकाविरोधात सदोष मनुष्यवथाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार चालक मोहम्मद सरफराज शेख विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. वरळीहून  वांद्र्याच्या दिशेनं भरधाव वेगात इनोव्हा कार जात होती. इनोव्हा कारमधून सहा प्रवासी प्रवास करत होते. ही इनोव्हा कार सर्वात आधी सी-लिंकवर मर्सिडीज गाडीला धडकली. त्यानंतर सुसाट वेगानं तिथून निघून गेली. पुढे जाऊन या कारनं वांद्रे सीलिंकवरील टोलनाक्यावर टोल भरत असलेल्या इनोव्हा आणि क्विड गाडीला पाठीमागून जोरदार धडक मारली. इनोव्हा गाडीच्या पाठोपाठ होंडा सिटी कारनंही इनोव्हा गाडीला धडक देत, वांद्रा-वरळी सी लिंकवरील टोल नाका 11 आणि 10 वरुन जाणाऱ्या टॅक्सिला धडक दिली.  वांद्रे वरळी सी लिंकवरील टोल नाक्यापासून २०० मीटर अंतरावर इनोव्हा गाडीनं मर्सिडीजला टक्कर दिली होती. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना टोल नाक्यावर थांबलेल्या वाहनांना ईनोव्हानं धडक दिली. ईनोवा गाडीतील तिघांचा मृत्यू झाला आहे.

Protected Content