Order : राज ठाकरे यांच्या सभेआधी औरंगाबाद येथे जमावबंदीचे आदेश

औरंगाबाद – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । औरंगाबाद येथे होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेसाठी मनसे परवानगीच्या प्रतीक्षेत असताना त्याआधीच पोलीस आयुक्तांनी जमावबंदीचे आदेशाचे पत्र काढले आहेत.

यात औरंगाबाद येथे आज मंगळवार, दि.२६ एप्रिलपासून ९ मे पर्यंत जमावबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र यायला परवानगी नाही. त्यामुळे ‘राज ठाकरे यांच्या सभेचं काय होणार ?’ असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

आज औरंबादमध्ये मुक्तार शिक्षक संघटनेचे रौप्य महोत्सवी अधिवेशन पार पडलं यात शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे आदी. नेते उपस्थित होते. या कार्यक्रमास परवानगी मिळते मात्र ‘राज ठाकरे यांनी सभा घ्यायचं घोषित केलं तर जमावबंदीचे आदेश का दिलेत ? त्याना अजून परवानगी का नाही? असा प्रश्न मनसे नेते विचारत आहेत.

Protected Content