क.ब.चौ.विद्यापीठातर्फे योग दिनानिमित्त ऑनलाईन कार्यशाळा

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय सेवा योजना विभाग, उच्च व तंत्र शिक्षण संचालनालय, रासेयो विभागीय कार्यालय, पुणे आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ रासेयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महामारीच्या काळात योगासने व प्राणायाम यांचे महत्व’ या विषयावर रविवारी आंतरराष्ट्रीय ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेचे उद्घाटन कोस्टारिका येथील योगतज्ज्ञ तसेच कोस्टारिकाच्या भारतातील दूत मारियाला क्रुज यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी रासेयोचे राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य अतुल सांळूखे होते. प्रमुख पाहूणे म्हणून प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर होते. रासेयो संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.माहुलीकर यांनी आपल्या भाषणात सद्याच्या काळात प्रत्येकाने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यावर भर द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. पहिल्या सत्रात लोणावळा येथील योगतज्ज्ञ डॉ.मनमत घरोटे यांनी योगा व प्रतिकार शक्ती यावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात थायलंड येथील प्रा.डॉ.धिरावट यांनी कोरोनावर मात करण्याच्या उपाययोजना याची माहिती दिली. शेवटच्या सत्रात भुवनेश्वर येथील डॉ. सच्चिदानंद बेहरा यांनी टाळेबंदीच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी योगाचे महत्व यावर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेचे सुत्रसंचालन डॉ. वैभव सबनिस यांनी केले. आभार डॉ. प्रवीण महाले यांनी मानले. श्रेया सबनिस, नितीन कापडीस व डॉ.प्रशांत कसबे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. भारतातून जवळपास दिड हजार रासेयो कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी स्वयंसेवक यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला. झुम व फेसबुक याद्वारे ही ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली.

Protected Content