गणेश कॉलनीतील नागरीकांचा आयुक्तांना घेराव; महापालिका प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । गेल्या काही वर्षांपासून महासभेत व प्रत्यक्ष गणेश कॉलनी रोडवरील ख्वॉजामीया दर्ग्यालगत रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत भाजपा नगरसेविका दीपमाला काळे यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. पाठपुरावा करून देखील प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे कुंभकर्णी प्रशासनाविरोधात आज १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांना आज धरणे आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी दीपमाला काळे, नगरसेवक सचिन पाटील, बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, पिंटू काळे उपस्थित होते. पाठपुरावा करून देखील प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे कुंभकर्णी प्रशासनाविरोधात आज १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांना आज धरणे आंदोलन करण्यात आले.

गेल्या दीड ते दोन वर्षांपासून गणेश कॉलनी परिसरातील ख्वाजामियालगत असलेल्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. यासंदर्भात स्थानिक नगरसेवकांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला अतिक्रमण काढण्यासाठी मागणी व वारंवार निवेदन देण्यात आले आहे. गेल्या दीड वर्षांपासून हे प्रकरण महापालिका प्रशासनाला माहिती असतांना अजूनपर्यंत कोणत्याही पध्दतीने कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे संतप्त ख्वॉजामिया परिसरातील नागरीकांना आज महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ धरणे आदोलन केले. आज महापालिकेत महासभा असल्यामुळे महापालिकेचे आयुक्त सतिष कुळकर्णी हे महापालिकेच्या आवारात येतात धरणे आंदोलकांना ढोल बजाव आंदोलन केले. तसेच आयुक्त सतिष कुळकर्णी यांनी अतिक्रमण कारवाईबाबत विलंब का होत आहे असा जाब विचारला. यावर आपण लवकर चर्चा करणार असल्याचे आयुक्त कुळकर्णी यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना नगरसेवक बंटी जोशी, नगरसेवक प्रशांत नाईक, नगसेवक गणेश सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, उपमहापौर सुनिल खडके, नगसेवक सचिन पाटील, अतुलसिंग हाडा यांच्यासह बंटी नेरपगारे, केदार देशपांडे, धीरज पाटील,प्रविण राणे, नेमीचंद छाजेड, राहुल अवस्थी, डॉ. रितेश पाटील, योगेश पाटील, प्रविण भोळे, अविनाश भोळे, संजय चौधरी, प्रमोद खाचणे, हेमंत चौधरी, वंदना कोष्टी, अर्चना पाटील, मालु पाटील, मंगला पाटील, पुनम पाटील, अलका पाटील, संदीप इंगळे, यागेश पाटील, प्रशांत निशानदार, उज्वल रायसोनी, राजदीप शर्मा, चंद्रशेखर मगर, आदी गणेश कॉलनी व ख्वॉजामिया परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1028668077610784/

Protected Content