Home Cities जळगाव वरणगाव येथे महागाई विरोधात शिवसेनेचे थाळीनाद आंदोलन  

वरणगाव येथे महागाई विरोधात शिवसेनेचे थाळीनाद आंदोलन  

0
40

वरणगाव, दत्तात्रय गुरव | शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारतर्फे वाढवण्यात आलेल्या महागाईच्या विरोधात वरणगावातील बस स्टँड चौकात थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष समाधान महाजन, वरणगाव शहर प्रमुख संतोष माळी, विलास मुळे, चंदू शर्मा, शेख सईद आदी उपस्थित होते. यावेळी  महागाईच्या विरोधात भांडी हातात घेऊन थाळीनाद आंदोलन करण्यात आले. सरकारने लवकरात लवकर पेट्रोल, डिझेल दरवाढ परत घ्यावी व खाद्यतेलाचे भाव कमी करावे यासाठी सदर आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शिवसैनिकांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound