कृष्णापुरी सोसायटीत कपबशी फुटली तर पतंग उडाला

पाचोरा, नंदू शेलकर | कृष्णापुरी वि. का. सोसायटीच्या निवडणूकीत भाजपा पुरस्कृत सतिष शिंदे यांचे ‘शेतकरी विकास पॅनल’ ‘पतंग’ या निशाणीवर निवडून येत विजयी झाले; तर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पुरस्कृत ‘परिवर्तन पॅनल’ला साधा भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे कृष्णापुरी सोसायटीत ‘कपबशी फुटली तर पतंग उडाला’ असे बोलले जात आहे.

पाचोरा तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या कृष्णापुरी वि. का. सोसायटीत २३ वर्षांची सत्ता राखत शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून भाजपा पुरस्कृत सतिष शिंदे यांनी सतत २३ वर्ष सत्ता भोगून ही पुन्हा १३ पैकी १३ जागा जिंकून वर्चस्व प्रस्थापित केले असून आजी – माजी आमदारांच्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला १३ पैकी एकही जागा मिळविण्यात यश न मिळाल्याने परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडाला आहे. या निवडणुकीत पैशांचा मोठा घोडेबाजार झाल्याची चर्चा असुन सुमारे ३ हजार रुपये एक मतास पैसे दिल्याची संपूर्ण तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.

७२४ मतदारांनी बजावला मतादानाचा हक्क –

पाचोरा येथील कृष्णापुरी वि. का. सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक रविवारी झाल्यानंतर सायंकाळी ८ : ३० वाजेच्या दरम्यान निवडणुकीचे निकाल आल्यानंतर अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत ८२६ पैकी ७२४ मतदारांनी आपल्या मतादानाचा हक्क बजावला.

निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस प्रेरित परिवर्तन पॅनलतर्फे १३ उमेदवार तर भाजपा पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलतर्फे बाजार समितीचे माजी सभापती सतीश परशराम शिंदे व भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी ही १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले होते. यात वि. का. सोसायटीचे १ कोटी ४० लाख स्व भागभांडवल असून गेल्या २३ वर्षांपासून सतिष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली “अ” वर्गात संस्था सुरू आहे.

निवडणुकीत परिवर्तन पॅनलतर्फे कॉग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष विष्णु (बापु) सोनार हे पॅनल प्रमुख होते. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून विलास खैरनार व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव नारायण चौधरी यांनी काम पाहिले.

कपबशी फोडून विजयोत्सव साजरा

निवडणुक निकालानंतर भाजपा पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पुरस्कृत परिवर्तन पॅनलला साधा भोपळा ही फोडता न आल्याने या पॅनलचे निवडणूक निशाणी ‘कपबशी’ असल्याने  कपबशी फोडून व गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला. कृष्णापुरी वि. का. सोसायटीच्या विजयी निकालात सतिष शिंदे यांच्या शेतकरी विकास पॅनलमधील ‘पतंग’ या निशाणीवर निवडणूक आला.

शेतकरी विकास पॅनलमधील

सर्व साधारण ८ जागांमध्ये विजयी उमेदवार –

शिंदे सतिष परशराम (३९१),

अहिरे दिगंबर रामदास (३५७),

चौधरी शिवाजी अर्जुन (३५८),

चव्हाण हेमंत नामदेव (३५८),

महाजन शिवाजी गोविंदा (३६६),

वागणे दिलीप भिका (३५४),

पाटील काशिनाथ रामभाऊ (३४५),

पाटील ओमप्रकाश प्रभाकर (३६४),

इतर मागासवर्गीय जागेसाठी

चौधरी प्रकाश एकनाथ (४०७),

महिला राखीव जागेसाठी –

बोरसे मुक्ताबाई सिताराम (३७२),

शिंदे सिंधूबाई पंडितराव (४००),

अनुसूचित जाती जमाती जागेसाठी

देसाई प्रेमलाल शामलाल – (३८८),

विमुक्त जाती जमाती जागेसाठी

हटकर धोंडु भिवसन (४१३)

 

तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत

परिवर्तन पॅनलच्या सर्व साधारण ८ जागांवर पराभूत उमेदवार –

चौधरी बापु दौलत (२६४),

चौधरी सतिष नारायण (२७५),

देवरे सुरेश रुपचंद (२७९),

पाटील सुभाष गिरधर) (२८०),

पाटील स्वप्निल विजय (२७३),

सिनकर अभिजीत वसंत (२७३),

सोनवणे सुदर्शन आत्माराम (२५८)

इतर मागासवर्गीय जागेसाठी

चौधरी विष्णु देवराम (२८७),

महिला राखीव जागेसाठी

पाटील  इंदुबाई प्रकाश (२७३),

पाटील कुसुमबाई रामदास (२९२),

अनुसूचित जाती जमाती जागेसाठी –

ब्राह्मणे फकीरा सांडु (३०७),

विमुक्त जाती जमाती जागेसाठी –

भोई रविंद्र बाबुलाल (२८१)

याप्रमाणे मते मिळाली असून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलला एकही जागा न मिळाल्याने तालुक्यासह शहरात तर्क वितर्क लावण्यात येत आहे.

 

 

Protected Content