आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचतर्फे राज्य आयोग सचिव मेढे यांचा सत्कार

यावल प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे राज्य सदस्य सचिव के.आर.मेढे हे जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आले असता त्यांचा आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचाचे राज्याध्यक्ष एम.बी. तडवी यांनी मंचातर्फे सत्कार केला.

यावेळी जळगाव जिल्ह्यातील आदिवासी समाजावर सातत्याने होणाऱ्या अन्यायाबाबत व विविध ठिकाणी दाखल झालेल्या ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हयात तात्काळ् न्याय मिळण्याबाबत मागणी करण्यात आली. तसेच आदीवासी बांधवांच्या अनुसूचित जमाती आयोगाकडे दाखल केलेल्या आदिवासी समाजाच्या तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी. या करीता भेट घेउन विविध प्रकरणासह आदी आदीवासी समाज बांधवांच्या अडीअडचणी व समस्या संदर्भात संबधी आयोगाचे राज्य सदस्य सचिव के.आर. मेढे यांच्याशी संघटनेचे राज्य अध्यक्ष एम.बी. तडवी यांच्या शिष्ठ मंडळाच्या वतीने सविस्तर चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी आदीवासी एकता मंचचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख कदीर तडवी, उप प्रमुख सांडू तडवी, पहूर तसेच जिल्हा जिल्हा संघटक रब्बिल तडवी, यावल तालुका अध्यक्ष सरदार तडवी यांच्यासह संघटनेचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Protected Content