भुसावळ रनर्स भाऊबहिणीतर्फे रक्षाबंधन उत्साहात साजरा

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ स्पोर्ट्स ॲण्ड रनर्स असोसिएशनतर्फे रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने आज विशेष रनचे आयोजन करण्यात आले. यावेळी रनर्सचे महिला आणि पुरूष सदस्य यांनी एकत्र धावून आरोग्याचा संदेश दिला. त्यानंतर विधिवत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. 

सुरुवातीला सकाळी 5.45 वाजता वार्म अप झाले. त्यानंतर 6 वाजता सदस्यांनी धावायला सुरुवात केली. सर्व सदस्यांनी पाच ते दहा किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण केले. त्यानंतर स्ट्रेचिंग एएक्सरसाइज घेण्यात आली. 7.30 वाजता ऑफिसर्स कॉलनीजवळ डॉ. चारुलता पाटील, डॉ.निलिमा नेहेते, योगशिक्षिका पुनम भंगाळे यांनी प्रमोद शुक्ला, प्रवीण वारके, रणजीत खरारे, गणसिंग पाटील, प्रवीण पाटील यांना राखी बांधून विधीवत रक्षाबंधन सण साजरा केला. याप्रसंगी डॉ. संजय नेहेते यांची विशेष उपस्थिती होती.

 भुसावळ रनर्सचे 100 हून अधिक महिला व पुरुष सदस्य एकत्र धावण्याचा सराव करतात. सध्या कोरोना आजाराच्या निर्बंधांमुळे प्रत्येक सदस्य एकाकी धावून सराव करीत आहे. लवकरच सर्व सदस्य एकत्र सराव करू असा आशावाद यावेळी डॉ. नीलिमा नेहेते यांनी व्यक्त केला. भुसावळ रनर्सचे सर्व सदस्य  भाऊ बहिणीचे नाते जोपासत नेहमी एकत्र धावत असतात. आजचे रक्षाबंधन प्रातिनिधिक असून आम्ही सर्व बहिणी आमच्या रनर्स बंधूंचे आरोग्य कायम उत्तम राहू देत अशी प्रार्थना करतो, असे डॉ. चारुलता पाटील यांनी सांगितले. रक्षाबंधनाच्या या पवित्र सणानिमित्त आयोजित या रनबद्दल प्रवीण फालक,  डॉ. तुषार पाटील , ब्रिजेश लाहोटी ,सचिन अग्रवाल यांनी सर्व सदस्यांचे कौतुक केले.

Protected Content