विद्यापीठात घडलेल्या घटनांवर चर्चा करण्यासाठी ऑफ लाईन सभा : विष्णू भंगाळे (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी ।  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मागील काळात घडलेल्या अनेक घडामोडीवर चर्चा करावयाची असल्याने सिनेट सभा ऑफ लाईन सभा घेण्याची मागणी केली असता प्रभारी कुलगुरू यांनी ती मान्य केल्याने ही   सभा पुढील १५-२० दिवसात होईल अशी माहिती देत विद्यापीठात प्रभारी राज असल्याने  सिनेट सदस्य विष्णू भंगाळे यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजसी बोलतांना नाराजी व्यक्त केली.

 

सिनेट सदस्य विष्णू भंगाळे यांनी  यांनी पुढे सांगितले की,  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ याची दरवर्षाप्रमाणे सिनेटची बैठक मार्च महिन्यात होत असते. यावेळी जी सिनेट बैठक झाली यात काही तांत्रिक अडचणी आल्यात. प्रभारी कुलगुरू  डॉ. ई. वायूनंदन हे ऑनलाईन सभेला उपस्थितच राहिले नाहीत.  यामुळे बैठक रद्द करण्यात यावी अशी मागणी आम्ही काही सिनेट सदस्यांनी केली. दरम्यान ४५ मिनिटांनी प्रभारी कुलगुरू हे ऑनलाईन पद्धतीने बैठकीला उपस्थित झालेत. त्यांनी बैठकीला उशिरा येण्याचे जे कारण सांगितले ते एकदम संयुक्तिक होते.  मात्र, अध्यक्ष शिवाय बैठक कशी होऊ शकते असा प्रश्न काही सिनेट सदस्यांनी उपस्थित करत ही सभा रद्द करण्यात यावी अशी मागणी केली. ती मान्य करून प्रभारी कुलगुरू यांनी सभा रद्द करून पुढील १५ -२० दिवसात ऑफ  लाईन सभा घेण्याबाबत आश्वासन दिले. 

विद्यापीठात प्रभारी राज 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रभारी राज चालू  आहे. या प्रभारी राजमध्ये सर्व पदांवर प्रभारी बसल्याने त्यांनी सिनेट सभा घेण्याबाबत घाई केली असा आरोप केला. तसेच या प्रभारी अधिकाऱ्यांनी प्रभारी कुलगुरू  डॉ. ई. वायूनंदन यांची देखील सभेबाबत सांगितले होते किंवा नाही अशी शंका उपस्थित केली.  या प्रभारी अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना ३१ मार्च पर्यंत सभा घ्यावयाची आहे तर ऑफ लाईन सभेस परवानगी द्यावी असे पत्र दिले होते. जळगाव शहर व जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती बघता जिल्हाधिकारी ऑफ लाईन सभेला परवानगी देणार नाहीत हे माहित असताना देखील कोरोनाची रुग्ण वाढत असतांना देखील यांनी मागणी  असता जिल्हाधिकारी यांनी ऑन लाईन ३१ मार्च रोजी घेण्याबाबत आदेश दिल्यानंतर अजेंडा काढण्यात आला मात्र हे काही सिनेट सदस्यांना पटले नाही.

मी प्रभारी कुलगुरू यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करून ऑन लाईन सभेत आपण बजेट मंजूर करता आहात हि बाब त्यांच्या लक्षात आणून दिली.  या विद्यापीठात काही घटना घडल्या आहेत त्यावर चर्चा करावयाची असल्याने ऑन लाईन सभा घेतली तर त्यावर चर्चा होणार नाही ही वस्तुस्थिती त्यांच्यापुढे मांडली. यासह इतर काही विषयांवर गहन चर्चा करावयाची आहे. जसे माजी कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांना काम करू दिले नसल्याने त्यांनी राजीनामा दिलेला आहे.  यासह इतर महत्त्वाच्या विविध विषयांवर चर्चा करावयाची असल्याने ही सभा ऑफ लाईन घ्यावी अशी मागणी करण्यात आली असता प्रभारी कुलगुरू यांनी  ती मान्य करून ३१ मार्च ची सभा रद्द केली असून पुढील १५-२० दिवसात सिनेट सभा घेण्याबाबत आश्वासन दिल्याचे सांगितले.  दरम्यान, प्रभारी कुलगुरू यांना खर्च करता यावा यासाठी मागील सिनेटच्या बैठकीत बजेटला तात्पुरती मंजुरी दिलेली आहे. अर्थ संकल्प मंजूर झालेला नाही मात्र, विद्यापीठ चालविण्यासाठी येणाऱ्या खर्चास मंजुरी देण्यात आलेली असल्याचे श्री. भंगाळे यांनी स्पष्ट केले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3959783220731631

 

Protected Content