फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलक यांचा सन्मान

रावेर प्रतिनिधी । राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाभरात उकृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम केल्याबद्दल फैजपूर प्रांतधिकारी कैलास कडलक यांचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.

मतदार दिनानिमित्त प्रशासकीय यंत्रणा मार्फत कैलास कडलक यांनी मतदार संदर्भात कार्यक्रम यशस्वीरित्या राबविले होते. १२ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रावेर व यावल तालुक्यामध्ये प्रांतधिकारी कैलास कडलक यांनी उकृष्ट काम केले होते. यामध्ये युवक मतदारांसाठी नोंदणी अभियान राबवीणे, मतदान संदर्भात जन-जागृती करणे इत्यादी कामे उकृष्ट राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दखल घेऊन त्यांना उकृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून सन्मान केला आहे.

उकृष्ट सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणुन तहसीलदार उषाराणी देवगुणे, उकृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून साजिद तडवी, उकृष्ट मतदार डाटा एंट्री ओपरेटर म्हणून विक्रम राठोर यांचा सन्मान केला आहे. अशी माहिती रावेर तालुका प्रशासनाकडून दिली आहे.

Protected Content