कोरोना : सरकारी कार्यालयांमधील बायोमेट्रिक प्रणालीचा वापर बंद

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यभरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारी कार्यालयांमधील बायोमेट्रिक प्रणालीचा वापर बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

 

राज्य शासनाकडून सोमवारी यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले. यानुसार उद्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांना हजेरी पटावर उपस्थिती नोंदवावी लागणार आहे. गेल्या आठवडाभरात देश आणि राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून खबरदारीचे उपाय योजले जात आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे ३८ रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि मॉल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Protected Content