‘त्या’ संघटनेच्या टार्गेटवर होते पंतप्रधान मोदी !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेच्या टार्गेटवर पंतप्रधान मोदी हे असून त्यांना मारण्याचा कट रचण्यात आला होता, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वीच देशभरात पॉप्युलर फ्रंट इंडियाच्या कार्यालयांवर कारवाई करण्यात आली. यात शंभरपेक्षा जास्त संशयितांना अटक करण्यात आली असून बरीचशी सामग्री देखील जप्त करण्यात आलेली आहे. दरम्यान, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून पंतप्रधान मोदी यांच्या जुलै २०२२ रोजी पाटण्यातील झालेल्या रॅलीला लक्ष्य करण्यात आले होते. असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने केला आहे.

या वृत्तानुसार युपीतील काही संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करण्याचा कट देखील पीएफआयच्या सदस्यांनी रचलेला होता. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाटणा दौर्‍यादरम्यान हल्ला करण्यासाठी पीएफआयकडून १२ जुलै २०२२ रोजी प्रशिक्षण शिबिराची स्थापना करण्यात आली होती. केरळमधून अटक केलेल्या पीएफआय सदस्य शफिक पायेथच्या विरोधात रिमांड नोटमध्ये ईडीने हा खळबळजनक दावा केला आहे. ईडीकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

Protected Content