बुलढाणाचे पालकमंत्र्यांनी घेतली हॉटेल व्यवसायिकाची परेड

बुलढाणा – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ. राजेंद्र शिंगणे हे अकोला जिल्ह्यातील कुटासा येथे आले होते. तेथून परतीच्या प्रवासात  गांधीग्राम येथील एका हॉटेलमध्ये ते चहा पिण्यासाठी थांबले. त्यावेळी त्यानी व्यावसायिकावर प्रश्नांचा भडिमार करत सौम्य भाषेत काही सूचना दिल्या. हा व्हिडिओ सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे..

जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे संपर्क मंत्री ना डॉ. राजेंद्र शिंगणे हे आज बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने अकोला जिल्ह्यातील कुटासा येथे आले होते. तेथून ते अकोला येथे जात असताना गांधीग्राम येथील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले. त्यावेळी त्यानी व्यावसायिकावर प्रश्नांचा भडिमार करत सौम्य भाषेत काही सूचना दिल्या. हा व्हिडिओ सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे..

त्यावेळी त्यांनी हॉटेलमधील तळणासाठी वापरण्यात येणाऱ्या तेलाची पाहणी केली. सदर तेल किती वेळा वापरतात ? याची चौकशी केली. तेल जास्तीत जास्त तीन वेळाच वापरावे. अशा सूचना केल्या. आमच्या अधिकारी तपासणीसाठी आले होते का ? अशी विचारणादेखील केली. तेल जास्त वेळ वापरल्यास शरीरास हानिकारक असते त्यामुळे आपण देखील हे तपासलं पाहिजे. असा सल्ला सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी दिला.

एकंदरीत मवाळ असे व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या डॉ.राजेंद्र शिंगणे  यांचा ताफा आज एका हॉटेलसमोर थांबतो. व्यवसायिकावर प्रश्नांचा भडिमार यासह सौम्य भाषेत सूचना करण्याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे..

Protected Content