समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडीओ माध्यमात पसरू नये- पोनि किरण शिंदे

जामनेर, प्रतिनिधी | सोशल मीडिया हाताळताना ग्रुपवर आलेले फोटो किंवा व्हिडीओमुळे समाजात तेढ निर्माण करतील असे फॉरवर्ड करू नका असे आवाहन पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी केले आहे. ते सोशल मीडिया जनजागृती बैठकीदरम्यान बोलत होते.

जामनेर पोलीस स्टेशन येथे सोशल मीडिया जनजागृती बाबत बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पोलीस अधीक्षक कार्यालय सोशल मीडिया प्रमुख पोलीस उपनिरीक्षक गणेश कोळी, पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे, तुषार पाटील, सुनील माळी आदी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये सोशल मीडिया वापरतांना घेण्याची काळजी याबद्दल माहिती देताना पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी सांगितले की, आपण सोशल मीडिया वापरताना ग्रुप वर येणाऱ्या फोटो किंवा व्हिडीओ याची शहानिशा करावी जर ते खरे असेल तरच फॉरवर्ड करा अन्यथा करू नका व याबाबत चुकीचा असेल तर एडमिन च्या लक्षात आणून द्यायला पाहिजे. कारण चुकीच्या फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल झाल्याने धार्मिक व सामाजिक तेढ गोष्टी निर्माण होते व अशांतता पसरते. जातीय वाद वाढतात . त्यामुळे जर अशा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या फोटो किंवा व्हिडिओ ग्रुप वर टाकले गेले. व त्यामुळे काही वादविवाद झाले तर संबंधित टाकणारे व ग्रुप ऍडमिन वर गुन्हा दाखल होतो व त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे पत्रकार व प्रतिष्ठित व्यक्तींनी संबंधित व्हाट्सअप ग्रुप ॲडमिन यांना ग्रुप चालवताना चुकीच्या फोटो फॉरवर्ड करू नका अशी जनजागृती केली पाहिजे असे आव्हान या वेळी पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी केले. तर पोलीस अधीक्षक सोशल मीडिया प्रमुख पोलिस उपनिरीक्षक गणेश कोळी यांनी सोशल मीडिया बाबत माहिती देताना सांगितले की, एकदा व्हाट्सअप ग्रुपचा चालवताना योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे कारण आपल्या ग्रुप किंवा सोशल मीडियामुळे कोणाची भावना दुखणार नाही जातीय तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ग्रुप ॲडमिन ने काळजी घेतली पाहिजे कारण जर एखादी चुकीचा फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल झाला तर वाद विवाद निर्माण होतात व सामाजिक भावना दुखावल्या जातात त्यामुळे अशा प्रकारच्या तक्रारी आल्या तर कायदेशीर रित्या गुन्हा दाखल होऊ व्हाट्सअप ग्रुप ॲडमिन व चुकीची पोस्ट फॉरवर्ड करणाऱ्यावर कारवाई होऊ शकते त्यामुळे आपण चुकीच्या फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करू नका अशी माहिती या बैठकीत बोलताना दिली.

Protected Content