बोदवड तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था

बोदवड प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था झाले आहे. रस्त्या दुरूस्तीचे कामे शासनाने हाती घेतले असल्याने ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाची कामे केली जात असल्याची तक्रार  भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष  रामेश्वर लोहार यांनी केली आहे.

 

बोदवड तालुक्यातील रस्ते अत्यंत खराब झाल्याने वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते. सुरवाडा-मुक्तळ-पळासखेडे, बोदवड ते घाणखेड या रस्त्याचे काम सुरू आहे. दरम्यान ठेकेदाराकडून हे चांगल्यारितीने केले जात नसल्याची ओरड नागरीकांकडून केली आत आहे. यावेळी रस्त्यावर  टाकलेले खडी आणि डांबर यांचे मिश्रण व्यवस्थीत नसल्याने रस्ता तयार करून काही दिवस होत नाही तोच खराब होत आहे. या खडीवर डांबरचा वापर कमी प्रमाणात केली जात असल्याने चार दिवसा रस्ता उखडायला सुरूवात होत आहे. दरम्यान एणगाव ते घाणखेड दरम्यान तयार केलेला सिमेंटचा रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याने त्याच पध्दतीने पुढील कामे देखील सुरू आहे. अश्या कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी  भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष  रामेश्वर लोहार यांनी केली आहे.

Protected Content