शहरात कोरोना येतोय बाहेरून !; टेस्ट कुणी करावी; तज्ञ काय सांगताय वाचा

९० टक्के रूग्ण प्रवास करून आलेले

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाचा उद्रेक सर्वत्र होत असतानाच आता जळगाव जिल्ह्यातही कोरोनाचे एकाच दिवसात तिपटीने रुग्ण वाढले आहेत. मात्र हा कोरोना बाहेरून जिल्ह्यात येत असल्याचे तपासण्यांवरून समोर येत आहे. सद्य स्थ‍ितीत बाधित रुग्णांमध्ये ९० टक्के रुग्ण्‍ा हे बाहेरून प्रवास करून आलेले आहेत. .

जिल्ह्यातील ॲक्टीव्ह केसेसे एकाच दिवसात थेट ९१ वर पोहचल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. यातील १२ रुग्णांना लक्षणे आहेत. अशा स्थीतीत आता आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. मुंबईत एकाच दिवसात १५ हजारांवर रुग्ण समोर येणे ही चिंतेची बाब आहे.  कारण मुंबई व पुणे येथून जळगावात येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे.

 

शहरात धोका वाढतोय

शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३५ वर पोहोचली आहे. सातत्याने शहरात रुग्ण वाढून येत आहेत. त्यातच यातील ९० टक्के रुग्ण्‍ा हे बाहेरील जिल्ह्यातून प्रवास करून आलेले आहेत. विशेष बाब म्हणजे ज्यांना लक्षणे होती त्यांनी स्वत:हून तपासणी करून घेतली आहे. अशी माहिती समोर येत आहे.

 

कोणी करावी तपासणी

बाहेरील राज्यातूनच तसेच जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी चाचणी करून घ्यावी. विशेषत: मुंबई, पुणे येथून येणाऱ्यांनी दक्षता घ्यावी

ज्यांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आहेत, त्यांनी तपासणी करावी.

लवकर निदान झाल्यास गांभिर्य टाळता येते.

कोविड नसल्याचे स्पष्ट झाल्यास नियमीत उपचार घ्यावेत.

शासकीय तंत्रनिकेतनच्या कोविड तपासणी केंद्रावर कोरोनाची तपासणी होते.

 

तारांबळ उडते तर आधी टेस्ट करा : डॉ. संजय पाटील

कोविड आणि अन्य व्हायरल इंफेक्शनची लक्षणे सारखी असल्याने तारांबळ उडू शकते, तेव्हा आधी चाचणी करा खात्री करून घ्या, कोविड आहे का नाही आणि त्यानंतर उपचार घ्या. बाहेरून आलेल्यांनीही ही दक्षता घ्यावी. त्रिसूत्रीचे पूर्ण पालन होणे गरजेचे आहे. कोरोनाचा आलेख हा वाढलेला आहे. असे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.

Protected Content