हाजी गफ्फार मलिक यांना मरणोत्तर ‘जळगाव रत्न’ : महासभेत प्रस्ताव मांडणार महापौर

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते हाजी गफ्फार मलिक यांना महापालिकेतर्फे दिला जाणारा ‘जळगाव रत्न’ हा मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्याची घोषणा महापौर जयश्री महाजन यांनी केली. या संदर्भात आपण आगामी महासभेत प्रस्ताव मांडणार असल्याचे महापौरांनी जाहीर केले आहे.

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते हाजी गफ्फार मलिक यांचे शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याचे लक्षात घेवून ‘जळगाव रत्न’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महापालिकेच्या महासभेत पुरस्कार देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करून छत्रपती संभाजी राजें नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार असल्याचे महापौर महाजन यांनी सांगितले. यापुर्वी ‘जळगाव रत्न’ पुरस्कार जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन, स्व. डॉ. अविनाश आचार्य आणि ॲड. उज्ज्वल निकम यांना देण्यात आला आहे. 

हाजी गफ्फार मलिक यांनी मुस्लिम समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ॲग्लो संस्थेची स्थापना करून शिक्षणापासून वंचित असलेल्या मुस्लिम समाजाला उच्च शिक्षित करण्याचे काम केले. त्याचे शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातही उल्लेखनिय कामगिरी केले. या सर्व गोष्टींचा विचार करून महापालिकेतर्फे ‘जळगाव रत्न’ पुरस्कार लवकर देण्यात येणार असल्याची माहिती महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले. या संदर्भात आपण आगामी महासभेत प्रस्ताव मांडणार असल्याचे महापौरांनी जाहीर केले आहे.

Protected Content