वीज तारा कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

मुक्ताईनगर/ बोदवड (पंकज कपले) प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील हरणखेड येथे वीज तारा कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू जागीच मृत्यु झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की, रमेश श्रावण तायडे (रा. हरणखेड ता.मलकापुर जि.बुलढाणा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.  हे तालुक्यातील हरणखेड येथे शेतात काम करीत असताना विजेचे तार पडल्याने मरण पावले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच तात्काळ मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ग्रामीण रुग्णालय बोदवड येथे जाऊन झालेल्या घटनेची माहिती घेऊन वीजवितरणचे अधिकारी व तहसीलदार यांचेशी चर्चा करुन संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करून शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकरी कुटुंबास शासकीय मदत तात्काळ मिळण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.