‘मी मोदींना मारु शकतो’ – नाना पटोलेंचं वक्तव्य – भाजपने केला या वक्तव्याचा निषेध

मुंबई वृत्तसंस्था | ‘मी मोदींना मारु शकतो’ अशा प्रकारच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत असून या वक्तव्याचा भाजपने निषेध केला आहे. दरम्यान “मी ते वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याबद्दल केलं नसून भंडाऱ्यातील एका गावगुंडाबाबत केलं असल्याचा खुलासा पटोले यांनी केला आहे.

भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस असल्याने नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात ‘पक्षाचा मजबूतीसाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या. सायंकाळी घेण्यात आलेल्या एका प्रचारसभेच्या दरम्यान नाना पटोले यांनी ‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे वक्तव्य केले केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून यावर विविध पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, “भंडारा जिल्ह्यात मोदी असं टोपणनाव असलेला एक गावगुंड आहे. त्या गुंडाबाबत बोलताना मी ते वक्तव्य केलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत ते नाही.” खुलासा नाना पटोले यांनी केला आहे

भाजपकडून या वक्तव्याचा निषेध केला जात असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही नानांच्या या वक्तव्यावर टीका करत ‘कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही? काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन? असं म्हणत नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते.’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content