लोकसभा निवडणूकीत ९७ कोटी मतदार

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | 2024च्या लोकसभा निवडणुकीत ९७कोटी लोक मतदान करू शकतील. निवडणूक आयोगाने शुक्रवारी सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांच्या मतदारांशी संबंधित विशेष सारांश पुनरावृत्ती 2024 अहवाल जारी केला.
आयोगाने म्हटले आहे की, 18 ते 29 वयोगटातील 2 कोटी नवीन मतदारांचा मतदान यादीत समावेश करण्यात आला आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत नोंदणीकृत मतदारांच्या संख्येत 6% वाढ झाली आहे.
निवडणूक आयोगाने सांगितले – लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी जगातील सर्वाधिक म्हणजे 96.88 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत. याशिवाय, लिंग गुणोत्तरदेखील 2023 मध्ये 940 वरून 2024 मध्ये 948 पर्यंत वाढले आहे.

5 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना निवडणूक प्रचारात कोणत्याही स्वरुपात लहान मुलांचा वापर करू नये, असा सल्ला दिला आहे. पक्षांना पाठवलेल्या ॲडव्हायझरीमध्ये, निवडणूक पॅनेलने पक्ष आणि उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान पोस्टर आणि पॅम्प्लेट वाटणे आणि घोषणाबाजी करणे याला झीरो टॉलेरन्स व्यक्त केला आहे.

Protected Content