समृध्दी महामार्गावर भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू, दोन जखमी

छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | साईबाबांच्या दर्शनासाठी समृद्धी महामार्गाने शिर्डीकडे जाणाऱ्या जालना जिल्ह्यातील भाविकांच्या कारचा शुक्रवारी रात्री 9.30 वाजता वैजापूरजवळ भीषण अपघात झाला. यात कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक 504 जवळ ही दुर्घटना घडली.

जाफराबाद तालुक्यातील हलके तपोवन येथील 5 जण कारमधून (एमएच 21/ बीएफ 9248) रात्रीच्या वेळी शिर्डी येथे साई दर्शनाला जात होते. साडेनऊ वाजेच्या सुमारास कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांची गाडी कंटेनरवर पाठीमागून धडकली. 9.45 वाजता समृद्धी महामार्गावरील आपत्कालीन क्रमांकावर अपघाताची माहिती कळली. तेथील सुरक्षा यंत्रणा तसेच स्थानिकांनी गंभीर जखमींना वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथून दोघांना छत्रपती संभाजीनगरला, तिघांना कोपरगावला हलवण्यात आले होते.

उमेश उगले, राहुलराज भोज व भाऊसाहेब पैठणे या तिघांचा मृत्यू झाला. तर महिको कंपनीत देऊळगावराजा येथे कार्यरत रवींद्र मन्सूरराव फलके यांच्यासह अन्य एक प्रवासी जखमी झाल्याची माहिती रुग्णालयातून मिळाली.

कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात झालेल्या या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून, दोघे जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी पोहचत जखमींना वैजापूर येथे उपचारासाठी दाखल केले. अपघातात MH 21 BF 9248 या क्रमांकाच्या कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झालाय. मृत राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे हे जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील रहिवासी असून, ते शिर्डीकडे निघाले होते. अपघातात फलके व वाघ हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे.

Protected Content