तातडीने गुगल क्रोम अपडेट करां; सरकारने दिला गंभीर इशारा

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारत सरकारच्या कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) गुगल क्रोम यूजर्सना गंभीर इशारा दिला आहे. क्रोम ऑपरेटिंग सिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्यामुळे तातडीने हा ब्राऊजर अपडेट करून घेण्याचं आवाहन सरकारने केलं आहे.
प्रत्येक ब्राऊजरमध्ये सायबर सुरक्षेसाठी काही प्रमाणात अँटी-व्हायरस फायरवॉल दिलेली असते. मात्र, हॅकर्स नवनवीन पद्धतीने ही वॉल भेदण्याचा प्रयत्न करत असतात. सॉफ्टवेअर जुनं झाल्यास ते नवीन प्रकारच्या व्हायरसना अडवण्यास सक्षम ठरत नाही. अशाच प्रकारचा धोका जुन्या क्रोम ब्राऊजवर असल्याचं सरकारने म्हटलं आहे.

कम्प्युटर किंवा मोबाईलवर सायबर हल्ला झाल्यास यूजर्सची गोपनीय माहिती, गुगलवर सेव्ह असणारा डेटा, कम्प्युटरमधील डेटा, सेव्ह असणारे पासवर्ड अशा कित्येक गोष्टी हॅकर्सच्या ताब्यात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या मोबाईल आणि ब्राऊजरचे सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करणं गरजेचं असतं.

Protected Content