दोन लाखांसाठी चारित्र्यावर संशय घेत महिलेचा छळ

 

चाळीसगाव: प्रतिनिधी । माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणत चारित्र्यावर संशय घेऊन पतीसह सासरच्यांकडून शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याची फिर्याद एका  महिलेने  शहर पोलिस ठाण्यात सासरच्यांविरूध्द  दाखल केली आहे.

 

आशा जगदीश गुजर (रा. शेंदुर्णी ता. जामनेर) हिचे  लग्न जगदीश गुजर यांच्याशी २२ नोव्हेंबर २०११ रोजी झाले  जगदीश गुजर शेंदुर्णी येथील नगरपालिकेत क्लार्क  आहेत. त्यांना  ८ वर्षांची ऋतूजा हि मुलगी आहे. लग्नानंतर सुरुवातीला दीड महिना पतीसह सासरच्यांकडून चांगली वागणूक मिळाली. मात्र नंतर पती, सासरे पंडित गुजर, सासु सुशिला गुजर, जेठ विनोद गुजर व जेठाणी मणिषा गुजर, नणंद दिपाली गुजर व पतीचे मित्र धर्मराज सुर्यवंशी आदींकडून माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणत चारित्र्यावर संशय घेऊन या महिलेचा  शारीरिक व मानसिक छळ केला  जात होता

 

दरम्यानच्या काळात हि बाब गंभीर झाली  पतीसह सासरच्यांकडून आशा गुजर हिला मारहाण करून माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणत चारित्र्यावर संशय घेतला गेला.  पती जगदीश गुजर यांनी मला तु चालत नाही म्हणून २ नोव्हेंबर २०२० रोजी आशा गुजर हिला घरातून हाकलून दिले  मुलगी ऋतूजा   हिला आपल्याजवळ  ठेऊन घेतले . तेव्हापासून आशा गुजर आपल्या आई सुनंदा घेवरे यांच्याकडे (रा. टाकळी प्र.चा) राहत आहे. शेवटी कंटाळून आशा हिने शहर पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्यांविरूध्द दि. १४ रोजी सायंकाळी फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास धर्मराज पाटील करीत आहेत.

Protected Content