मोहम्मद शमीला मिळणार अर्जून पुरस्कार

नवी दिल्ली-वृत्तसेवा | क्रीडा विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून 2023 या वर्षासाठी क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुरस्कार आहे. तसेच इतर खेळाडूंनाही पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने त्याचं सोशल मीडियावर अभिनंदन केलं जात आहे. तसेच तो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. दरम्यान संबंधित खेळाडूने वर्षभर केलेल्या कामगिरीच्या जोरावर संबंधित खेळाडूंची पुरस्कारासाठी निवड केली जाते.

मोहम्मद शमी याने नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये धमाकेदार कामगिरी केली. शमीने 13 व्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्व विक्रम केला. मोहम्मद शमी एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला. त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन बीसीसीआयने शमीच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार शमीला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Protected Content