प्रौढाचा बाथरूममध्ये अकस्मात मृत्यू

WhatsApp Image 2019 08 23 at 12.10.28 PM

जळगाव प्रतिनिधी | लघुशंकेला गेलेल्या ४९ वर्षीय व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाल्याचे रात्री ११.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आले. याबाबत रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत मनोहर पिले (वय ४९, नवी पेठ जळगाव ह.मू.महाबळ कॉलनी) हे रात्री दहा वाजता नेहमीप्रमाणे झोपले. दरम्यान त्यांना ११.३० वाजता लघुशंकेसाठी जाग आली. त्यावेळी ते बाथरूममध्ये गेल्यानंतर आतून कडी लावली होती त्यातच ते अचानकपणे खाली कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान पप्पा अजून बाथरूममधून बाहेर आले नाही म्हणून मुलगा अक्षय याने दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न केला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडून पाहिले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले.मयत अभिजीत पिले हे मेडिकल इन्स्ट्रुमेंट विकण्याचे काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे. मोठी मुलगी मुंबई येथे शिक्षणासाठी राहते तर मुलगा अक्षय हा दहावीत शकतो. या घटनेबाबत रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास पोहेका अनिल फेगडे, सुभाष सोनवणे करीत आहे.

Protected Content