अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू ; अज्ञात वाहनाने दिली होती धडक

accident jal

जळगाव प्रतिनिधी | तांदलवाडी येथून गोरगावले येथे नातेवाईकांकडे दुचाकीने जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने जखमी झालेल्या तरुणाचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत शहर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नथ्थू जनार्दन कांडेले (वय 32, रा तांदळवाडी ता.रावेर) हे शेत मजूर असून शेतीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गुरुवारी 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३०च्या सुमारास तांदलवाडी येथून गोरगावले येथे जाण्यासाठी दुचाकीने घरून निघाले.नथू यांच्या दुचाकीला चिंचोली गावाजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत जळगाव शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेका संजय झाल्टे आणि पोका विजय जाधव करीत आहे. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, दोन भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे.

Protected Content