‘त्या’ हत्या प्रकरणाचे आजच्या खुनाशी आढळून आलेय साम्य !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील कासमवाडी परिसरात झालेल्या तरूणाच्या खुनाने जळगाव हादरले आहे. काही दिवसांपूर्वी पिंप्राळा रेल्वे गेटजवळ झालेल्या खुनाप्रमाणेच या तरूणाला संपविण्यात आले असून या दोन्ही घटनांमध्ये साम्य आढळून आले आहे.

शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळ असलेल्या गोदामाजवळ अनिकेत गणेश गायकवाड (रा. राजमालती नगर, जळगाव) या तरूणाचा खून २५ मे रोजी पहाटे झाला होता. यानंतर नऊ दिवसांनी शहरातील कासमवाडी परिसरात भरणार्‍या आठवडे बाजारातल्या मच्छी बाजार भागात सागर वासुदेव पाटील याची हत्या झाली आहे.

अनिकेत प्रमाणेच सागरच्याही चेहर्‍यावर दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आलेली आहे. अनिकेतच्या मृतदेहाजवळ दारूच्या बाटल्या आढळून आल्या होत्या. तर सागर वासुदेव पाटीलच्या मृतदेहाजवळ देखील बियरची बाटली आढळून आली आहे. यामुळे या मर्डरचेही दारू पिण्याशी कनेक्शन असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

दरम्यान, या खुनाची माहिती मिळताच पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तर श्‍वान पथक व ठसेतज्ज्ञांनी देखील परिसराची पाहणी केली. या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून मयत तरूणाचे पार्थिव जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: