यावल येथे बेकायदेशीरपणे गुरांचे मांंस बाळगणाऱ्यास साहित्यासह अटक

यावल, प्रतिनिधी । येथील शहरातील डांगपुरा परिसरातील झोपडपट्टीत सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर गुरांचे मांस बाळगणाऱ्यास पोलीसांनी कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, आज रविवार २ ऑगस्ट रोजी यावल चोपडा मार्गावरील चिंचोळया झोपडपट्टी परिसरातील पोलीस निरिक्षक अरूण धनवडे हे दुपारी १२.५ वाजेच्या सुमारास गस्तीवर असतांना हॉटेल खान जवळच्या मागील बाजुस प्लास्टीकचा आडोशा लावलेल्या ठिकाणी लोकांची गर्दी दिसुन आली. यामुळे पोलीस त्या ठिकाणी पाहणी करण्यास गेले असता लोकांनी त्या ठिकाणाहुन एकाने पळ काढला. या ठीकाणी पोलीसांनी गोवंश जातीचे १५ किलो मांस किंमत ३००० रूपये, मांस कापण्याच्या दोन सुऱ्या एक कुऱ्हाड आदी साहीत्यासह अफजल करीम शेख (वय-३०, वर्ष राहणार डांगपुरा) यास अटक केली. पोलीस कर्मचारी सतिष एकनाथ भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनमध्ये भादवी कलम ४२९ सह महाराष्ट्र प्राणी सरंक्षण अधिनियम १९७६ चे ५, ६, ९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ११९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, घटनेचा तपास पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी नेताजी पंडीत वंजारी हे करीत आहे.

Protected Content