यावल तालुक्यात वाघाचे दर्शन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी परिसरातील हतनूर पाट्याजवळ वाघ दिसल्याचे शेतकरी सांगत आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या गंभीर बाबीकडे वनविभागाने तातडीने लक्ष घालावे. अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

याबाबत सविस्तर असे की, साकळी-मनवेल रस्त्यालगतच्या साकळी शेतशिवारातील हतनुर पाटाजवळील भागात दि.२ जून रोजी सकाळी साडेसहा ते सात वाजे दरम्यान गावातील शेतकरी शेतात जात असतांना शरीराने धडधाकट असलेला पट्टेदार असा वाघ सदृश्य जंगली प्राणी अगदी रुबाबात फिरतांना दिसून आला.या शेतकऱ्याने अंदाजे पंचवीस ते तीस फुटावरून वाघ सदृष्य जंगली प्राणी बघितला तेव्हा तो शेतकरी खूप घाबरला.तो जंगली प्राणी जोपर्यंत दिसेनासा होत नाही तोपर्यंत या शेतकऱ्याने काहीएक हालचाल न करता स्तब्ध उभे राहिले व त्यानंतर आपल्या घरचा रस्ता धरला. वाघ सदृश्य प्राण्यांचे दर्शन झाल्याची चर्चा गावात झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन या भागातून मनवेल – थोरगव्हाण कडे जाणारा मुख्य रहदारीचा व शेतकऱ्यांच्या वापरायचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावरून दिवसभर ये जा करणाऱ्यांची मोठी वर्दळ असते तसेच रात्री-बेरात्री शेतकऱ्यांना आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी जावे लागते.

दरम्यान वाघ सदृश्य प्राणी दिसल्याची चर्चा होतास प्रवासी व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.तरी या गंभीर प्रकाराकडे वनविभागाने लक्ष देऊन सदर जंगली प्राण्याचा त्वरीत बंदोबस्त करावा तसेच शेतकरी वर्गाला सतर्क करण्यासाठी आपल्या पातळीवरून योग्य त्या सूचना कराव्यात. अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!