राज्यापालांनी राजीनामा द्यावा’ – महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाची माहिती

जळगाव, संदीप होले | छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र जनक्रांती मोर्चातर्फे निदर्शने करण्यात येऊ जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यात मुकुंद सपकाळे, अमोल कोल्हे यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झालेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेख करून चुकीचा संदर्भ देणारे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांचे अपमानास्पदरित्या विधान केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र जनक्रांती मोर्चातर्फे आंदोलन करण्यात येत असून या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी जळगाव यांना देण्यात आले.

राज्यपाल यांच्यावर गुन्हा दाखल करून चुकीचा इतिहास आणि खोटी माहिती सांगणाऱ्या राज्यपालांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी आणि इतर राजीनामा घेण्यात यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली या निवेदनावर महाराष्ट्र जनकापूर मुख्य जळगाव मुकुंद सपकाळे रमेश सोनवणे भारत सासणे भारत ससाणे चंदन बिऱ्हाडे महेंद्र केदारे दिलीप सपकाळे बाबूराव वाघ वाल्मिक सपकाळे अमोल कोल्हे सुरेश तायडे साहेब राव वानखेडे जगदीश सपकाळे दादाराव शिरसाठ चंद्रकांत नन्नवरे युवराज सुरवाडे टाईम पटेल सचिन बिऱ्हाडे भारत सोनवणे पितांबर अहिरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

व्हिडीओ लिंक –
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3067673816882243

Protected Content