चाळीसगावातील जवान ट्रेनिंगसाठी रवाना

चाळीसगाव प्रतिनिधी । नुकतीच बी.एस.एफ मध्ये निवड झालेल्या तालुक्यातील वाघळी येथील संजय चौधरी यांची कन्या हर्षाली चौधरी हिची पंजाब येथे ट्रेनिंगसाठी बोलावणे आल्याने रात्री १२ वाजता रेल्वे स्थानकावर नातेवाईकांसह खान्देश रक्षक संस्थेचे तालुका अध्यक्षांनी शुभेच्छा देत निरोप घेतला.

तालुक्यातील विविध भागांतील मुलं व मुली ह्या खडतर परिस्थितीशी संघर्ष करून देशसेवा करण्यासाठी पदभरती झाले आहे. ट्रेनिंगसाठी बोलावणे आल्याने रात्री १२:०० वाजता रेल्वे स्थानकावर जमून खान्देश रक्षक संस्थेचे तालुका अध्यक्षांनी शुभेच्छा देत निरोप घेतला. खान्देशातील मुले व मुली ज्यांची निवड नुकतीच देशसेवेसाठी झाली आहे. अशा सर्वांना ट्रेनिंगसाठी बोलावले जात आहे. ट्रेनिंगला जाण्यासाठी रात्री १२ वाजता चाळीसगाव रेल्वे स्थानकावर एकत्रित आले होते. यावेळी खान्देश रक्षक संस्था महाराष्ट्र तालुका अध्यक्ष पी.ए.पाटील या जवानांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. या सर्वांमध्ये नुकतीच बी.एस.एफ मध्ये निवड झालेल्या तालुक्यातील वाघळी येथील संजय चौधरी यांची कन्या हर्षाली चौधरी ह्या पंजाबसाठी रवाना झाल्या. 

हलाखीची परिस्थिती असताना हर्षाली हिने मिळविलेले यश इतर मुलींना प्रेरीत करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. जिथे मुलांना आर्मीत पाठवायला आई-वडील धजवत नाही अशावेळी आता मुलीही धडक देऊन आई-वडीलांचा नाव उज्ज्वल करताना दिसून येत आहे. खान्देशी रक्षक संस्था महाराष्ट्रचे तालुका अध्यक्ष पी.ए.पाटील यांचा मुलामुलींना घडवण्यात सिंहाचा वाटा आहे. यावेळी भारत माता की जय या घोषणांनी परिसर दणाणून गेला. याप्रसंगी अध्यक्ष पी.ए.पाटील, कार्यरक्षक रुपेश मालपुरे, प्रशांत जाधव, सचिन हाडपे व अंबादास जाधव आदी उपस्थित होते. ट्रेनिंगला जाण्यासाठी जमलेल्या सर्वांना खान्देश रक्षक संस्थेकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

 

Protected Content