बुलढाणा जिल्ह्यातील निर्बंधामध्ये शिथीलता

बुलडाणा प्रतिनिधी । जिल्ह्यात 26 जुन 2021 च्या आदेशानुसार 28 जुनपासून श्रेणी 3 मध्ये असलेले निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच 2 ऑगस्टच्या आदेशानुसार जिल्ह्यात सुधारित निर्बंध लागू करणेबाबत निर्देश आहेत. त्यानुसार जिल्ह्यात आधीच्या निर्बंधात शिथीलता आणून नविन निर्बंध 3 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजेपासून ते पुढील आदेशापर्यंत जिल्हादंडाधिकारी एस. रामामूर्ती यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत.  666   

या आदेशानुसार सर्व प्रकारची जीवनावश्यक च जिवनावश्यक वस्तुंशी संबंधित दुकाने/ आस्थापना तसेच सर्व प्रकारची बिगर जिवनावश्यक सेवा अंतर्गत येत असलेली दुकाने, आसथापना, शॉपिंग मॉल सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत खुली राहतील.   तसेच शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंतच सुरू असतील. रविवारी केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहतील. रविवारी अत्यावश्यक सेवेची वगळता अन्य सर्व दुकाने बंद राहतील.  व्यायाम, वॉकिंग, जॉगिंग, सायकलींगसाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक बगीचे, खेळाची मैदाने सुरू राहतील. सर्व प्रकारची शासकीय व खाजगी कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरू राहतील. ज्या कार्यालयांना वर्क फ्रॉम होमची सुविधा आहे, त्यांना सदर सुविधा सुरू ठेवता येतील. सर्व प्रकारची कृषी विषयक कामे, नागरी कामे, औद्योगिक कामे, मालाची वाहतूक पुर्ण क्षमतेने सुरू राहील. वातानूकुलीत सेवा वगळून व्यायामशाळा, योगा केंद्र, केश कर्तनालये, ब्युटी पार्लर, स्पा आदी एकूण क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू व रविवारी बंद राहतील. चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मल्टीप्लेक्सेस (स्वतंत्र आणि मॉल्सच्या आतील) सर्व प्रकारची धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. राज्य शालेय शिक्षण, उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण विभागांचे आदेश शाळा व महाविद्यालयांसाठी लागू राहतील. सर्व प्रकारचे रेस्टॉरंट एकूण क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यानंतर दुपारी 4 ते रात्री 8 पर्यंत तसेच शनिवार व रविवार या दिवशी केवळ पार्सल / टेक अवे व घरपोच सेवा सुरू राहील. रात्री 9* ते सकाळी 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता हालचालींना निर्बंध राहतील. गर्दी टाळण्यासाठी वाढदिवस समारंभ, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, निवडणूक, प्रचार, मिरवणूका, निर्दशने, मोर्चे आदींवर पुर्वीप्रमाणेच निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम राहतील. लोकांनी सर्व ठिकाणी आवश्यक सामाजिक अंतर, पाळण्यासोबतच कोवीड प्रतिबंधातूमक वर्तणूक व कोवीड त्रिसुत्रीचा काटेकोरपणे अवलंब (मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन, सॉनिटायजर किंवा हॅडवॉशने हाताची नियमित स्वच्छता) प्रत्येक नागरिकास बंधनकारक राहील.

सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. सदर नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती,संस्था,संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधीत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिका-यास या आदेशाद्वारे पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात येत आहे

 

Protected Content