मारूळ येथील ९० वर्षीय आजीबाईंना आठ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर मिळाले पैसे

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील मारूळ येथील ९० वर्षीय निराधार आजीला  इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेची लाभार्थी असून आठ वर्षांपासून त्यांच्या बँके खात्यात  पैसे जमा असतांना देखील आधार कार्ड अद्यावत नसल्याने त्यांना ते मिळत नव्हते. ही बाब लक्षात आल्यावर प्रशासन अधिकरी व लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन  त्यांना ती रोख रक्कम मिळवून दिली. 

मारुळ येथील इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेची लाभार्थी  सुगराबी बशीरुद्दीन फारूकी (वय९० वर्ष)  या आजीबाईंचे   आधार अद्यावत नसल्यामुळे त्यांचा  आठ वर्षांचा पगार मिळाला नव्हता.  यावल तहसीलदार महेश पवार व यावल पंचायत समिती सदस्य तथा जळगाव जिल्हा नियोजन समिती सदस्य  शेखर सोपान पाटील, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष मसरूर अली सय्यद, यावल तालुका काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष  इखलास सय्यद हे देवदूतच ठरले.   त्या आजीबाईंचा आठ वर्षांचा पगार ५८ हजार रुपये जेडीसीसी बँक शाखा मारूळ येथील त्यांच्या खात्यावर जमा होते. परंतु, आधारकार्ड अद्यावत नसल्यामुळे त्यांना ते मिळत नव्हते. ही बाब काँग्रेस नेता जिल्हा परिषद गट नेता  प्रभाकर आप्पा सोनवणे, जावेद अली तथा कदीर खान, ग्रामपंचायत सदस्य सुलतान पटेल, अल्पसंख्यांक यावल शहराध्यक्ष  रहेमान खाटीक, सेव फाउंडेशन यावल शहराध्यक्ष नईम शेख मखतार सेठ नादिम मिमबर साहेब अली, बाळू तायडे , प्रवीण हटकर, हसरतअली सय्यद, नदीम सय्यद, युवराज इंगळे आदींच्या सहकार्याने आठ वर्षांचा पगार ५८  हजार रुपये त्यांचे हक्काचे त्यांना मिळाले. आठ वर्षाची प्रदीर्घ प्रतीक्षा संपून हक्काचे पैसे मिळाल्याने आजीबाईच्या  चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता.

 

Protected Content