प्रहार जनशक्तीला खिंडार; युवा जिल्हाध्यक्षांचा ठाकरे गटात प्रवेश

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष राजेंद्र महाजन आपल्या समर्थकांसह मातोश्री येथे जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. यामुळे रावेर परिसरात प्रहार जनशक्ती पक्षाचा धक्का मानला जात आहे.

 

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्याहस्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष  अविनाश पाटील, जिल्हाध्यक्ष तथा रावेर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र रामदास महाजन याचा जाहीर प्रवेश मुंबई येथे करण्यात आला. सोबत प्रहारचे रावेर तालुक्यातील उपतालुका प्रमुख भगवान कोळी, प्रहारचे रावेर उपशहरप्रमुख शेख लतीफ यांनी प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख दिपकभाऊ राजपुत, शिवसेना उपतालुका प्रमुख नितीन महाजन, उपविभाग प्रमुख स्वप्नील गिरडे, तुषार निंबाळकर आदी उपस्थिती होती.

Protected Content