बेमुदत संपात यावल तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा सहभाग

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुनी पेन्शन योजना लागु करण्याच्या विषयावर राज्य सरकार व राज्यातील कर्मचारी बांधव यांच्या झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने सर्व कर्मचारी हे मध्यरात्री पासून बेमुदत संपावर गेले. या अनुषंगाने यावल तालुक्यातील शिक्षक, महसुल कर्मचारी, ग्रामसेवक, पंचायत समिती कर्मचारी नगर परिषद कर्मचारी हे बेमुदत संपात सहभागी झाले आहे.

 

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक व आदी कर्मचारी यांनी यावल पंचायत समितीच्या आवारातुन राज्य शासनाच्या निर्णया विरूद्ध घोषणा देत पंचायत समिती पासुन यावल तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी तहसीलदार महेश पवार यांना आपल्या जुनी पेन्शन लागु करण्यासंदर्भातील मागण्याचे निवेदन दिले. यावेळी मोठया संख्येत महसुलचे कर्मचारी शिक्षक या बेमुदत संपात सहभागी झाले. आपल्या मागण्यासाठी सरकारी चांगलेच आक्रमक झाले. मागण्या मान्य होईपर्यंत आता संपाची माघार होणार नसल्याचे निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. या सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा परिणाम पंचायत समिती, शाळा, महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केन्द्र, नगर परिषद, आदीवासी एकात्मीक कार्यालया अंतर्गतच्या आदीवासी आश्रम शाळा याशिवाय अवेक सरकारी विभागाच्या कार्यालयावर व कामकाजावर मोठा परिणाम होतांना दिसत आहे.

Protected Content