भुसावळात इंद्रधनुष्य व प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा शुभारंभ

bhusawl indradhanushya

भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रीय शहरी आरोग्‍य अभियान अंतर्गत महात्मा फुले नगर प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे जळगाव रस्त्यावरील गणेश कॉलनीतील विट भट्टीवरील लसीकरणापासून वंचित राहीलेल्या बालकांचे व गरोदर स्त्रियांचे लसिकरण करण्‍यासाठी विशेष मोहीम इंद्रधनुष्य २ व प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यात आली.

सदर विशेष मोहीम इंद्रधनुष्य २.०अंतर्गत नियमीत लसीकरणापासून वंचित राहिलेली बालके व गरोदर महिलांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी कार्यक्षेत्रात जाऊन वंचित बालके व गरोदर महिलांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.सदर मोहीम मार्च २०२० पर्यंत नियमित सुरू राहणार आहे.

या इंद्रधनुष्य २ व प्रधानमंत्री मातृ वंदना मोहिमेचे शुभारंभ भुसावळ नगर परिषदेच्या आरोग्य समिती सभापती सुषमा नगरसेविका प्रतिभा पाटील,नगरसेवक युवराज लोणारी,नगरसेवक मुकेश पाटील आदी उपस्थित होते.मोहीम राबवीण्‍यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मान्यवरांनी दिले. महात्मा फुले नगर नागरी प्राथमीक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अतिया खान व यावल रोड नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ तौसिफ खान यांनी अभियानाबाबत माहीती दिली व लसिकरणाची उपयुक्तता लाभार्थ्यांना समजवुन सांगितली.

Protected Content