लम्पी आजारामुळे गुरांचा बाजार बंद; जिल्हाधिकारी यांचे आदेश

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी स्किन डीसीज या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गुरांचा बाजार अर्थात खरेदी विक्री करण्याचे व्यवहार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नुकतेच काढले आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यात गुरांमध्ये लम्पी स्किन डीसीज साथ रोगाचे आजार निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अनेक भागात गुरांवर आजाराचे प्रमाण वाढले आहे. याची दखल घेत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बाधित क्षेत्रापासून १० किलोमिटर परिघातील परिसरात जनावरांची खरेदी आणि विक्री वाहतूक बाजार व जत्रा प्रदर्शन आयोजित करण्यात प्रतिबंध २७ ऑक्टोबरपासून रद्द करण्याचे आदेश आज रविवारी २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहे. त्यामुळे प्रतिबंधीत परिसरातील जनावरांना बाजारात आणू नये असे आवाहन जिल्हाप्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Protected Content