एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीसकडून गरजुंना धान्य वाटप

जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनमुळे मोलमजुरी करणारे गोरगरीबांना एमआयडीसी पोलीस ठाण्यातील महिला कर्मचारी यांनी धान्य व तेलाचे किट देवून मदत केली.

यावल तालुक्यातील चुंचाळे येथील आराध्य दैवत श्री समर्थ रघुनाथ बाबा व वासुदेव बाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे औचित्य साधत येथील बाजिराव गंगाराम पाटील यांची मुलगी व एमआयडीसी पोलीस ठाण्यातील महिला पो.काँन्सटेबल भावना पाटील यांनी ४ मे व ५ मे रोजी दोन दिवस आपल्या कुलगुरुंची पुण्यतिथी सोहळ्याचे औचित साधत चुंचाळे व गायराण मधील आदिवासी वस्ती पाड्यातील गरजू लोकांना स्वखर्चातून मदत केली. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले गायराण या आदिवासी वस्तीतील व गावातील गरिब व गरजूंना ३०० किलो गव्हाचे व ३०० किलो तांदुळाचे तसेच १०० किलो तेलाचे वाटप केले अजून काही गरजु कुंटूबास धान्य द्यायचे असल्याचे भावना पाटील यांनी सांगितले. भावना उर्फ अर्चना पाटील यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी मोलमजुरी करणारे गोरगरीबांना घरात बसू रहा असे आवाहनही यावेळी केले.

यांची होती उपस्थिती
बाजिराव पाटील (वडील), कल्पना पाटील (आई), छोटु पाटील (काका), सपना पाटील (काकु), पियुष पाटील (भाऊ), माही (बहीन), मानसी (मुलगी), पत्रकार प्रकाश चौधरी, ज्ञानेश्वर कोळी, पप्पु पाटील, ज्ञानेश्वर राजपूत,दिपक नेवे,डिगबंर साळुखे,महेश पाटील (दादु)उपस्थित होते . मित्रपरिवाराच्या हातून सदर चुंचाळे व गायराण भागातील नागरिकांना धान्याचे घरपोच वाटप करण्यात आले या निराधार लोकांना महिला पोलिस कर्मचारीने आधार दिला आहे. भावना पाटील यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Protected Content