फेसबुकवर आता राजकीय समूहांची निर्मिती कायमची बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । यापुढे फेसबुकवर पॉलिटिकल ग्रुप्स केले जाणार नसल्याचं मार्क झुकरबर्ग यांनी सांगितलं आहे. अमेरिकेच्या निवडणुकीच्या वेळी कंपनीने हा निर्णय घेतला होता.

खरंतर, फेसबुकने २०२० च्या शेवटच्या तिमाहीत चांगला नफा कमावला. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कंपनीने ११. २२ अब्ज डॉलर्स म्हणजेच प्रति शेअर ३. ८८ डॉलर्सची कमाई केली.

ऑक्टोबरमध्ये, कंपनीने अमेरिकन निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर वातावरण तापू नये म्हणून हा निर्णय घेतला होता. कंपनी आपल्या न्यूज फीडमध्ये वापरकर्त्यांद्वारे पाहिलेली राजकीय माहिती कमी करण्याचा विचार करत असल्याची माहितीही मार्क यांनी दिली आहे. झुकरबर्ग म्हणाले की, “आम्ही आमच्या कम्युनिटीकडून फीडबॅक घेतसा आहे. तो ऐकल्यानंतर असं दिसून आलं की, लोक आता राजकीय बातम्या पाहणं पसंत करत नाहीत. त्यामुळे त्यांनी सेवा बदलण्याचा विचार केला आहे.”

कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गात लोका घरात असल्यामुळे फेसबुकचा वापर वाढला. इतकंच नाही तर डिजिटल जाहिरातींमधून मिळणारा महसूलही वाढला आहे.

फेसबुकच्या उत्पन्नाबद्दल बोलायचं झालं तर ते २२ टक्क्यांनी वाढून सुमारे २८ . ०७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचलं आहे. इतकंच नाही तर फेसबुकचा मासिक वापरकर्त्यांचा आधार १२ टक्क्यांनी वाढून सुमारे २ . ८ अब्ज पोहोचला आहे. २०२० च्या शेवटी फेसबुकवर तब्बल ५८ ६०४ कर्मचारी काम करत होते.

Protected Content