अभिमानास्पद : पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या शर्यतीत तीन जळगावकर !

जळगाव-आशुतोष हजारे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची निवड प्रक्रिया सुरू होत असून याच्या शॉर्ट लिस्टमध्ये तीन जळगावकर मान्यवरांची नावे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी निवड प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आगामी १८ आणि १९ मे रोजी यासाठीच्या मुलाखती होणार असून यानंतर कुलगुरूपदाची निवड जाहीर करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी एकूण २७ अर्ज शॉर्टलिस्ट करण्यात आले असून यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील तीन मान्यवरांचा समावेश आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील डॉ. अशोक महाजन, प्रा. म. सु. पगारे आणि प्रा. बी. व्ही. पवार या तिघांची पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी शॉर्ट लिस्टमध्ये निवड करण्यात आलेली आहे. आयआयटी मुंबई येथे अंतिम निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे शैक्षणिक क्षेत्रात अतिशय प्रतिष्ठीत विद्यापीठ म्हणून ख्यात आहे. या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी जळगावातील मान्यवराची निवड होणार का ? याकडे आता शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Protected Content