कारण नसतांना तरूणाला फायटरने बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कासमवाडी येथील कब्रस्तान मागील गेट जवळ काहीही कारण नसतांना तरूणाला लोखंडी फायटरने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी समोर आले आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, गौरव भरत कुंवर वय २४ रा. अष्टभुजा मंदीराजवळ, कासमवाडी जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत असतो. दरम्यान, रविवारी १० मार्च रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास गौरव हा कासमवाडी येथील कब्रस्थानजवळ उभा होता. त्यावेळी काहीही कारण नसतांना जयंत वाणी, लखा वाणी, विशाल साळुंखे सर्व रा. कासमवाडी जळगाव या तिघांनी लोखंडी फायटरने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. हा प्रकार घडलयांनतर दुसऱ्या दिवशी सोमवारी ११ मार्च रोजी दुपारी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गौरव कुंवर याने तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी जयंत वाणी, लखा वाणी, विशाल साळुंखे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले हे करीत आहे.

Protected Content