Home राजकीय विजयाशांती यांचा भाजपमध्ये प्रवेश

विजयाशांती यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
121

नवी दिल्ली- तेलुगू सिनेसृष्टीतील अभिनेत्री विजयाशांती यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

पूर्वाश्रमीच्या टीआरएसच्या खासदार विजयाशांती यांनी २०१४ साली के. चंद्रशेखर राव यांच्या टीआरएसला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तथापि काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेलंगण भाजपचे अध्यक्ष बी. संजय कुमार यांच्यासह विजयाशांती रविवारी दिल्लीत आल्या होत्या. त्यानंतर त्यांचा आज भाजप प्रवेश झाला. 

मागील काही दिवसांपासून विजयाशांती यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. चित्रपट क्षेत्रातील कामगिरीसाठी दक्षिणेतील ‘लेडी अमिताभ बच्चन’ म्हणूनही विजयाशांती यांना ओळखले जाते.

 

 


Protected Content

Play sound