द्वारका नगरातून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील द्वारका नगर परिसरातून एका तरुणाची दुचाकी घरासमोरून चोरून येण्याची घटना शुक्रवार १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता समोर आली आहे. याबाबत सायंकाळी ७ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, राहुल रमेश मोरे (वय-३२, रा. द्वारका नगर, जळगाव) हा तरुण मोलमजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. गुरुवार १५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता त्याने त्याची दुचाकी (एमएच १९ बीव्ही ५२५५) ही घरासमोरून पार्क केली होती. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार दुसऱ्या दिवशी शुक्रवार १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले. दरम्यान राहुल मोरे यांनी त्याच्या दुचकीचा सर्व परिसरात शोध घेतला, परंतु दुचाकी संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे अखेर सायंकाळी ७ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय भालेराव हे करीत आहे.

Protected Content