यावल महाविद्यालयात वैद्यकीय तपासणी शिबीर उत्साहात (व्हिडिओ)

यावल प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या परिपत्रकानुसार जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

आय.क्यू.ए.सी. व विद्यार्थी विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर संपन्न झाले. या वैद्यकीय तपासणी शिबिर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे होत्या तर शिबिराचे  प्रमुख अतिथी यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला व प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारी नानासाहेब घोडके हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. संध्या सोनवणे यांनी म्हटले की, आयुष्यात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी समाजात आरोग्याविषयी जाणीवजागृती करावी असे आवाहन देखील केले. तसेच डॉ. बी. बी. बारेला यांनी वैद्यकीय तपासणी करून घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे सांगितले व आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आरोग्याविषयी मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक  उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी केले तर आभार विद्यार्थी विकास विभाग अधिकारी डॉ. एस. पी. कापडे यांनी मांडले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, प्रा. संजय पाटील प्रा. एस. आर. गायकवाड, डॉ. एच. जी. भंगाळे, डॉ. आर. डी. पवार, डॉ. पी. व्ही.  पावरा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यांनी परिश्रम घेतले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/340810244168926

Protected Content