पिंपळगाव हरेश्वर सरपंचपदी सुमनबाई सावळे यांची बिनविरोध निवड

 

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर ग्रामपंचायतीसाठी सरपंच, उपसरपंच निवड करण्यात आली. यात सरपंचपदाच्या एका उमेदवाराने माघार घेतल्याने सुमनबाई सावळे यांची बिनविरोध निवड झाली. 

सरपंच पदासाठी सुमनबाई सावळे व सुरेखा अनिल महाजन यांचे फॉर्म आले होते. तर उपसरपंच पदासाठी सुखदेव तोताराम गीते व अजय कडुबा तेली यांचे फॉर्म आले होते. सुरेखा अनिल महाजन यांनी माघार घेतल्याने सरपंचपदी सुमनबाई सुभाष सावळे यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंच पदासाठी गुप्त मतदान होऊन सुखदेव तोताराम गीते यांना १३ तर अजय कडूबा तेली यांना चार मते मिळाली. गावात महाविकास आघाडी प्रणित नम्रता पॅनलचे १७ पैकी १३ उमेदवार निवडून आलेले होते. सरपंच पद सर्वसाधारण महिला राखीव असताना पॅनल प्रमुख सुखदेव गीते, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शालिग्राम मालकर यांनी एससी समाजाच्या सुमनबाई सावळे यांना सरपंच करत एक वेगळा पायंडा समाजासमोर निर्माण केला असून या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सरपंच, उपसरपंच निवडी वेळी दिलीप जैन, मौजू जैन, कोमल देशमुख, युनूस बागवान, कैलास क्षीरसागर, मधुकर गोरे, मिलिंद देव, गोरख पाटील, सलीम शेख, रवींद्र गीते यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीला माजी आमदार दिलीप वाघ, आमदार किशोर पाटील, पी. टी. सी. चेअरमन संजय वाघ, शालिग्राम मालकर, उद्धव मराठे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Protected Content